PPF Vs SSY : जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजना किंवा PPF योजनेत गुंतवणूक करणार असाल तर गुंतवणुकीपूर्वी कोणत्या योजनेत उत्तम परतावा मिळतो ते जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही.
PPF
पीपीएफ ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे व्याज दर निश्चित आहेत आणि त्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे.
या योजनेची खास गोष्ट म्हणजे यात कर लाभ दिला जातो. ही योजना धारक आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा दावा करतात. या योजनेत मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम आणि मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर नसतो. अगदी कर्ज आणि प्री-मॅच्युअर पैसे काढण्याची सुविधा या योजनेत आहे.
सुकन्या समृद्धी योजना
सरकारने विशेषतः मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे. तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी या योजनेत गुंतवणूक करता येईल. या योजनेत पीपीएफच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. या योजनेचा लॉक-इन कालावधी २१ वर्षांचा असून याचा अर्थ तुमची मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला सुकन्या खात्यातून पैसे काढता येत नाही.
SSY ही करमुक्त योजना असून या योजनेत मुदतपूर्तीवर मिळणारे पैसे आणि व्याजावर कोणताही कर नाही. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यामध्ये फक्त 15 वर्षांसाठीच गुंतवणूक करावी लागणार आहे.
PPF की SSY कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी?
तुम्ही तुमच्या मुलीसाठी सामान्य बचत योजना शोधत असल्यास तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करावी. यात कर्ज आणि प्री-मॅच्युअर पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध असून जर तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्थिर योजना शोधत असाल, तर SSY हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण, लग्न आणि एकूणच सक्षमीकरणासाठी गुंतवणूक करता येईल. या दोन्ही योजनांमध्ये कोणताही धोका नसून ते करमुक्त देखील आहे. यात गुंतवणूकदाराला हमी परताव्याचा लाभ मिळतो.