Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. नावच फंडा की..! पहा नेमके काय आहे चिकन पॅरेंटिंगचे शास्त्र..!

पुणे : जगभरात नवनवे संशोधन सुरू असते. त्यातील काही संशोधनातून सकारत्मक तर, काहींमधून नकारात्मक निष्कर्ष समोर येतात. तर, काहीमुळे पुढे काहीही होत नाही. चीनने आता एक वेगळेच संशोधन केले आहे. त्याद्वारे मुलांना सुपर किड बनण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. जगभरातून या संशोधनाला मान्यता मिळण्यासाठी मात्र अजूनही मोठा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच याचे दावे कितपत ग्राह्य धरायचे हे ठरवले जाणार आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या दरम्यान चीन देशात मुलांमध्ये एक विचित्र प्रयोग करण्याची तयारी चालू आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांना सुपर किड्स बनवायचे आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे ठरेल असा दावा केला जात आहे. जर मुला-मुलींना प्रत्येक क्षेत्रात पुढे व्हायचे असेल, यशस्वी होण्यासाठी तयार करायचे असेल तर त्यांना चिकन पॅरेंटिंग स्वीकारावे लागेल, असे म्हटले जात आहे. चीनच्या चिकन पॅरेंटिंग योजनेंतर्गत मुलांना कोंबड्याच्या रक्ताचे इंजेक्शन दिले जाईल. याने त्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतील असा दावा केला जातो. वंध्यत्व, कर्करोग आणि टक्कल पडण्याची समस्यादेखील यामुळे समाप्त होईल. सिंगापूर पोस्टने दिलेल्या अहवालानुसार चिकनच्या रक्तात स्टेरॉईड्स असतात जे मुलांना क्रीडा क्षेत्रात तसेच अभ्यासामध्ये चांगले प्रदर्शन करण्यास मदत करू शकतात.

Advertisement

बीजिंग, शांघाय आणि ग्वांगझू येथे चिकन पॅरेंटिंग बाळांना वेगळी ओळख असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. चिकन पॅरेंटिंग हे अमेरिकेतील हेलिकॉप्टर पॅरेंटिंगप्रमाणे असल्याचा दावा केला जात आहे. ज्यात मुलांना प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. चिकन पॅरेंटिंगबद्दल असे मानले जाते की अभ्यास आणि संख्या पुरेसे नाहीत. याशिवाय मुलांना पुढे जाण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील. नॅशनल मेंटल हेल्थ डेव्हलपमेंटनुसार 2019-20 मध्ये 25 टक्के चिनी किशोरवयीन मुले नैराश्याने ग्रस्त होती. 7.4% पौगंडावस्थेतील एक गंभीर स्वरूपाच्या नैराश्याने ग्रस्त होते. चीनमधील मुलांनाही जगात दृष्टिदोषाच्या तक्रारींची संख्या सर्वाधिक आहे. 71 टक्के मिडल स्कूल आणि 81 टक्के हायस्कूल मुलांची दृष्टी कमी आहे. यावर मात करण्यासाठीही तिथे आता संशोधन चालू आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply