Take a fresh look at your lifestyle.

कोविड रुग्णांना कडकनाथ कोंबडी खाऊ घाला..! मध्य प्रदेशातील रिसर्च सेंटरचे मागणी, निर्णयाकडे लक्ष

नवी दिल्ली : कडकनाथ कोंबडी खाल्ल्यास कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढू शकते, अशा आशयाचे पत्र मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्चला (DHR) पाठवलं आहे. आता ‘आयसीएमआर’ व ‘डीएसचआर’ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

कडकनाथ कोंबड्याच्या मांसात हाय प्रोटीन, व्हिटॅमिन, झिंक आणि लो फॅट असतात. तसेच या कोंबड्या कोलेस्ट्रोल फ्रि आहेत. त्यामुळे या कोंबड्याचा समावेश ‘पोस्ट कोविड’ आणि कोविड काळात ‘डाएट प्रोटोकॉल’ केल्यास रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल, असे कृषी विज्ञान केंद्र आणि झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने म्हटलं आहे.

Advertisement

नॅशनल मीट रिसर्च सेंटर आणि मेडिकल जर्नलमधील प्रकाशित रिपोर्टच्या प्रतीही या पत्रासोबत जोडण्यात आल्या आहेत. तसेच ट्विटरवरही सूचनापत्रं दिलं आहे. दोन्ही संस्थांनी चिठ्ठी आणि कागदपत्रे ‘आयसीएमआर’ आणि ‘डीएचआर’ला पाठवली आहेत.

Advertisement

कडकनाथ कोंबड्यांचे मांस व अंड्यांचा समावेश कोविड रुग्णांच्या डाएटमध्ये करायचा की नाही, याचा निर्णय आता ‘आयसीएमआर’वर अवलंबून आहे. कोरोना संसर्ग झाल्यास कमी रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या रुग्णांवर कडकनाथ कोंबड्यांचा किती परिणाम होतो, हे प्राथमिक परीक्षणानंतरच समोर येईल. हे परिणाम सकारात्मक आल्यास त्याचा डाएटमध्ये समावेश केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.

Advertisement

कडकनाथ कोंबड्यांमध्ये कोलेस्ट्रोल आणि फॅट सारखी तत्त्व नसल्याचे हैदराबाद नॅशनल मीट रिसर्च लॅबोरेटरीने आधीच स्पष्ट केलं आहे. कोविड रुग्णांची प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी कोणते तत्व आवश्यक आहेत, त्यावर आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये एक लेखही प्रकाशित झालेला आहे. त्यामुळेच कडकनाथ कोंबड्यांचा समावेश कोविड रुग्णांच्या डाएटमध्ये करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

सोन्याच्या दरात जबरदस्त घसरण, चांदीचीही गटांगळी, पाहा कशामुळे झालीय घसरण..?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! माॅन्सूनचे पुनरागमन, पाहा कधीपासून सुरू होणार मुसळधार पाऊस

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply