Poultry farming: पोल्ट्रीवाल्यांच्या “त्या” समस्या झटक्यात सुटणार; वाचा महत्त्वाची सरकारी योजना
Poultry Farming : पुणे (pune) : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शासनाचे प्रतिनिधी यांची राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील ( Radhakrishn vikhe-patil) यांनी जाहीर केले. व्यवसायातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली.
कुक्कुटपालन (Poultry Farming) करणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी या समिती अन्वये आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. असे विखे-पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे बॉयलर लेअर्स (Broiler Layer) कुक्कुटपालन व्यवसायातील शेतकऱ्यांकडून पक्षी व अंड्यांची खरेदी कंपन्यांनी योग्य दराने करावी, अशी शेतकऱ्यांची रास्त भावना असून पोल्ट्री व्यवसायासाठी कृषीच्या दराने वीज आकारणी करावी, ग्रामपंचायत कर कमी करावा अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच कंपन्या व पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये करण्यात येणारा करार एकतर्फी असू नये, करार पोल्ट्री व्यावसायिक तसेच कंपन्या दोन्ही घटकांचे हित साधणारा असावा यासाठी या करारामधील अटी, शर्तींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येतील. पोल्ट्री व्यावसायिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असेही विखे-पाटील म्हणाले.
must read
- Poultry Farming Info: अशी तयार करा कोंबड्यांना तुसाची गादी; वाचा काय आहे याचे नामके शास्त्र
- Science News: महाभयंकर उल्का येतेय पृथ्वीकडे..! पहा NASA ने नेमके काय म्हटलेय
- Farmers: एकच नंबर..! शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुकमध्ये मिळाला 1.8 कोटींचे पॅकेज; जाणुन घ्या डिटेल्स