अहमदनगर – आपल्या देशात खाद्यपदार्थांचे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक राज्यातील खाद्यपदार्थही वेगळे आहेत. आज आपण उत्तर भारतातील उत्तराखंड (Uttarakhand) या राज्यातील एका खास खाद्यपदार्थाची माहिती घेणार आहोत. खरं तर, उत्तराखंडच्या या प्रसिद्ध खाद्य पदार्थाच्या चाहत्यांची कमतरता नाही. बटाटा डाळ भजे हा कमी वेळात तयार होणारा एक खाद्य पदार्थ आहे जो नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी चहासोबत खाऊ शकतो. या डिशची चव अप्रतिम आहे.
जर तुम्हाला हे भजे घरीच तयार करायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला ती बनवण्याची एक सोपी रेसिपी (Recipe) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ते सहज तयार करू शकता. बटाटा डाळ भजे बनवण्यासाठी मिक्स डाळ वापरली जाते, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात फक्त मूग डाळ देखील वापरू शकता. ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही.
साहित्य – उकडलेले बटाटे 3, मिक्स डाळ 100 ग्रॅम, कांदा 1, ब्रेड भुकटी 100 ग्रॅम, किसलेले अद्रक 1 चमचा, हिरव्या मिरच्या 4, गरम मसाला 1 चमचा, कोथिंबीर 1/4 कप, लिंबाचा रस 2 चमचे, तेल, मीठ चवीनुसार.
रेसिपी
भजे तयार करण्यासाठी प्रथम बटाटे (Potato) उकडून घ्या आणि एका भांड्यात काढून मॅश करा. यानंतर मिक्स डाळ घेऊन कुकरमध्ये टाकून उकडून घ्या. आता कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक करुन घ्या. यानंतर मॅश केलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे मीठ टाकून चांगले मिसळा. आता दुसरी वाटी घ्या आणि त्यात मिक्स केलेले डाळ, कांदा, किसलेले अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाका आणि सर्व चांगले मिसळा आणि स्टफिंग बनवा. आता तुमच्या हातावर थोडे तेलाने ग्रीस करा आणि मॅश केलेले बटाटे घ्या आणि तळहातांवर ठेवून सपाट करा. यानंतर मधोमध कांद्याचे सारण भरून ते बंद करून त्याचा गोळा तयार करा. या प्रकारे सर्व मिश्रण व सारणाचे गोळे तयार करून प्लेटमध्ये बाजूला ठेवा.
आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल तापत असताना, ब्रेडचे तुकडे घ्या आणि तयार केलेले गोळे एकामागून एक ब्रेडमध्ये टाका आणि चांगले गुंडाळा. तेल गरम झाल्यावर हे गोळे तेलात टाकून तळून घ्या. 3-4 मिनिटांत रंग सोनेरी होईल. त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढा. अशा पद्धतीने स्वादिष्ट बटाटा डाळ भजे तयार आहेत.
Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करा टेस्टी ब्रेड रोल; कमी वेळात होईल तयार