Post Office Scheme: जर तुम्ही वाढत्या महागाईचा विचार करून तुमच्यासाठी गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस एक शानदार आणि सुरक्षित योजना राबवत आहे.
या योजनेत तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकतात. होय, या योजनेत अगदी काही वर्षात तुमचे पैसे डबल होत आहे. यामुळे सध्या या योजनेत गुंतवणूक करण्याची संख्या वाढतच चालली आहे. चल मग जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची लोकप्रिय योजना किसान विकास पत्र योजनेबद्दल माहिती देत आहोत. तुम्हाला या योजनेत गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज मिळतो. हे जाणून घ्या कि ही एक अल्पबचत योजना असून पूर्णपणे सुरक्षित आहे.
KVP खाते कोण उघडू शकते?
या योजनेबद्दल पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइट दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही एकच खाते उघडू शकता. तुम्हाला या योजनेत तीन लोक मिळून संयुक्त खाते देखील उघडता येते. याच बरोबर पालक आणि 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने किंवा अस्वस्थ मनाच्या लोकांच्या वतीने त्यांच्या स्वत:च्या नावावर KVP खाते उघडू शकतात.
शरद पवारांना धक्का! रोहित पवारांवर ‘त्या’ प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; साखर कारखाना जप्त
1,000 रुपयांपासून गुंतवणूक
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही 1,000 रुपयांसह गुंतवणूक करू शकता. यानंतर तुम्ही 100 रुपयांच्या पटीतही गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या योजनेत जमा केलेली रक्कम अर्थ मंत्रालयाने वेळोवेळी विहित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होते, जी जमा करण्याच्या तारखेला लागू होते. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम 115 महिन्यांत दुप्पट होते.
मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करू शकतील
अधिकृत वेबसाइटनुसार, किसान विकास पत्र खाते काही विशिष्ट परिस्थितीत मॅच्युरिटीपूर्वी बंद केले जाऊ शकते. सिग्नल खाते किंवा संयुक्त खाते कोणत्याही किंवा सर्व खातेधारकांच्या मृत्यूनंतर बंद केले जाऊ शकते.
I.N.D.i.A. आघाडीला धक्का! मायावतींची मोठी घोषणा; अनेक चर्चांना उधाण
याशिवाय, अधिकारी असल्याने, गहाणखत जप्त केल्यावर किंवा न्यायालयाचा आदेश असताना ते बंद करू शकतात. हे खाते ठेवीच्या तारखेपासून 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर बंद केले जाऊ शकते.