Post Office Scheme: जर तुम्ही तुमच्या भविष्याच्या विचार करून जर गुंतवणूक करणार असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त आणि सुरक्षित योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून सहज दरमहा वीस हजार रुपयांची कमाई करू शकता. मग जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
या लेखात आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती पोस्ट ऑफिसची खास योजना आहे. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही बंपर परतावा प्राप्त करू शकता. हे जाणून घ्या कि, इतर बचत योजनांच्या तुलनेत या योजनेत तुम्हाला जास्त व्याज मिळते.
मराठा संघटनेकडून मोठी घोषणा! आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ….
इतकी गुंतवणूक करा
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये अल्प रक्कम गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळते आणि निवृत्तीनंतर तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतात.
पोस्ट ऑफिस योजना पात्रता
या योजनेचा लाभ फक्त 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे लोक घेऊ शकता. ज्यांनी वयाच्या 55 व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. तो VRS खाते उघडू शकतो. याशिवाय सेवानिवृत्त संरक्षण सेवेतील कर्मचारी वयाच्या 50 व्या वर्षीही खाते उघडू शकतात. माहितीसाठी जाणून घ्या कि, तुम्ही या योजनेत खाते तुमच्या जोडीदारासोबत उघडू शकता.
अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
ज्येष्ठ नागरिक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन SCSS खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी वृद्धांना किमान रु. 1,000 आणि कमाल रु. 30 लाख गुंतवावे लागतात. तुम्ही खात्यात रु. 1,000 च्या पटीत पैसे जमा करू शकता. ती 30 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.
10 वर्षांत ‘या’ स्टॉकने दिला 1200 टक्के परतावा; 1.2 लाखांची झाली कमाई
किती परतावा मिळेल
पोस्ट ऑफिसची SCSS योजना 8.2 टक्के वार्षिक व्याज देत आहे. जर एखाद्या व्यक्तीने सुमारे 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक 2.46 लाख रुपये व्याज मिळेल. त्यामुळे सुमारे 20 हजार रुपये मासिक उत्पन्न असेल.