अहमदनगर : पोस्ट ऑफिस बचत योजना गुंतवणुकीसाठी बचतीचे एक चांगले साधन आहे. पोस्ट ऑफिस बचत योजना पूर्णपणे जोखीममुक्त आहेत आणि चांगला परतावा देखील देतात. पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्राम सुरक्षा योजनेचाही समावेश आहे. जर तुम्ही ग्राम सुरक्षा योजनेसाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवले तर तुम्ही स्वतःसाठी 35 लाख रुपयांचा परतावा सुनिश्चित करू शकता. म्हणजेच या योजनेत महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास 35 लाख रुपये मिळू शकतात.
गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. यामध्ये, योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण पोस्होण्याआधी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. 19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये किमान 10,000 ते 10 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय देखील दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरू शकतात.
ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्ही कर्ज देखील मिळवू शकता. तथापि, पॉलिसी खरेदी केल्यापासून 4 वर्षांनीच कर्ज घेता येते. याशिवाय, पॉलिसीच्या मुदती दरम्यान प्रीमियम भरण्यात डिफॉल्ट असल्यास, तुम्ही प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ते पुन्हा सुरू करू शकता. या व्यतिरिक्त पोस्टाच्या आणखीही काही स्कीम आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता तसेच तुमचे पैसे देखील एकदम सुरक्षित राहतात. सध्याच्या काळात पोस्टात पैसे गुंतवणूकीकडे लोकांचा कल वाढला आहे,
- वाचा : वाव.. पोस्टाच्या ‘या’ स्कीम आहेत एकदम खास..! मिळेल चांगला परतावा, पैसाही राहिल सुरक्षित
- Post Office: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत मिळणार लाखोंचे रिटर्न; गुंतवा फक्त 100 रूपये