Post Office Scheme: आज अनेकजण भविष्याचा विचार करून विविध प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत आहे. यातच तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका दमदार योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन जास्त पैसे कमवू शकता.या योजनेत पैसे सुरक्षित ठेवण्यासोबतच बँकांच्या तुलनेत चांगले व्याज मिळते.
ही योजना मंथली सेव्हिंग स्कीम म्हणून ओळखली जाते. पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये, तुम्ही एका खात्याद्वारे किमान रु 1,000 आणि कमाल रु 9 लाख गुंतवू शकता.
संयुक्त खात्यात पैसे जमा करण्याची कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे. म्हणजे पती-पत्नी दोघे मिळून 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक गुंतवणूक करू शकतात.
हे जाणुन घ्या की या योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावावरही पैसे जमा करता येतात. परंतु या प्रकारच्या खात्यात गुंतवणूक फक्त 3 लाख रुपयांपर्यंत आहे. या योजनेत जमा करण्यासाठी पोस्ट ऑफिस फॉर्म भरावा लागेल. या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांना पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल.
सध्या, POMIS 7.4 टक्के दराने व्याज देते, जो इतर FD योजनांपेक्षा चांगला पर्याय आहे. खाते उघडण्यासाठी ओळखपत्र, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.
तुम्ही योजनेत किती काळ गुंतवणूक करू शकता?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेची परिपक्वता 5 वर्षे आहे. वेळेपूर्वी पैसे काढल्यास नुकसान सहन करावे लागू शकते. एक वर्षाच्या आत पैसे काढण्याची तरतूद नाही. तुम्ही 3 वर्षापूर्वी पैसे काढल्यास तुम्हाला 2 टक्के दंड भरावा लागेल. तुम्ही 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास, 1 टक्के रक्कम कापून तुम्हाला दिली जाईल.
या खात्याचे काय फायदे आहेत
तुम्ही हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये शिफ्ट करू शकता आणि 5 वर्षांची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही रक्कम पुन्हा गुंतवू शकता. या योजनेत नॉमिनीचीही नियुक्ती केली जाते. पोस्ट ऑफिस स्कीममध्ये टीडीएस देखील कापला जात नाही परंतु व्याजावर कर भरावा लागतो.