Post Office Savings Scheme: देशातील करोडो लोकांना आर्थिक फायदा करून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे.या सरकारी योजनांमुळे सामान्य लोकांना भविष्यासाठी मोठा निधी जमा करता येतो.
यातच जर तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही सुरक्षित योजनेबद्दल माहिती देणार आहोत.
या योजनांमध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून तुमच्या भविष्यासाठी लाखोंचा निधी सहज जमा करू शकतात. चला मग जाणून घेऊया या जबरदस्ती योजनांबद्दल सविस्तर माहिती.
महिला सन्मान प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सरकारने विशेषत: महिलांसाठी सुरू केले आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जून 2023 मध्ये सुरू करण्यात आली आहे. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणूक योजना मार्च 2025 पर्यंत म्हणजेच 2 वर्षांच्या कालावधीसाठी खुल्या आहेत.
ही योजना महिलांना 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय देते. यानंतर गुंतवणुकीच्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते. खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची तरतूद आहे. तुम्ही MSSC योजनेत 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2.32 लाख रुपये मिळतील. ही योजना अगदी FD प्रमाणे काम करते.
किसान विकन पत्र योजना
किसान विकास पत्र योजनेमध्ये वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणुकीची प्रक्रिया रु. 1000 पासून सुरू होते. याद्वारे तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
तुम्ही संयुक्त खाते उघडू शकता. यासोबत नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे. सरकार आपल्या गुंतवणुकीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. जर तुम्ही किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 115 महिन्यांच्या गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळेल. हे खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी देखील उघडले जाऊ शकते.
आरडी योजना
आरडी योजनेबद्दल बोलायचे झाले तर ते हमी परतावा देते. पोस्ट ऑफिस आरडी खाते सुरक्षित मानले जाते. तुम्ही या योजनेत मासिक किमान 100 रुपये किंवा 10 रुपयांच्या कोणत्याही पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस आरडीवर आता 6.5 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के दराने व्याज मिळणार आहे.
पीपीएफ योजना
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. हे खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडता येते. तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 1.50 लाख रुपये जमा करू शकता. या खात्याची परिपक्वता 15 वर्षे आहे. मॅच्युरिटीनंतर तुम्ही ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
पीपीएफ योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा 12,500 रुपये जमा केल्यास आणि ते 15 वर्षे ठेवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील.
यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल. तर व्याज 18.18 लाख रुपये असेल. यामध्ये व्याजदर बदलत राहतात. त्यामुळे मॅच्युरिटीवर पैसे बदलत राहतात.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
नवी करप्रणाली लागू करण्यासोबतच निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली होती. याअंतर्गत वृद्धांसाठी गुंतवणूक मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. सध्या त्यावर 8.2 टक्के व्याज आहे.
गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपये आणि व्याजदर 8.2 टक्के करण्याच्या अर्थमंत्र्यांच्या निर्णयानुसार, 42.30 लाख रुपयांच्या व्याजासह परिपक्वता रक्कम 12.30 लाख रुपये असेल. यामध्ये तुम्हाला दरमहा 20500 रुपये मिळतील.
पोस्ट ऑफिस बचत खाते
या योजनेत किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त जमा करण्याची मर्यादा नाही. संयुक्त खाते कोणत्याही व्यक्तीद्वारे किंवा कोणत्याही प्रौढ व्यक्तीसोबत उघडता येते.
अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने खाते उघडले जाऊ शकते. या योजनेवर सरकार 4 टक्के व्याज देत आहे.