Post Office Savings Scheme । ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची खास योजना! गुंतवणुकीवर मिळेल जबरदस्त परतावा

Post Office Savings Scheme । आपला म्हातारपण चांगले जावे, आपल्याला पैशांची उणीव भासू नये, यासाठी अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हीही गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही पोस्टाच्या एका खास योजनेत गुंतवणूक करू शकता.

जर निवृत्तीनंतर चांगला परतावा देणारा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असल्यास तुम्ही पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता, जी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.

जाणून घ्या पात्रता

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान ६० वर्षे असावे. जर एखाद्याने वयाच्या 50 किंवा त्यापेक्षा जास्त वयात स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) घेतल्यास तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो. संरक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेले लोकही यात गुंतवणूक करू शकतात.

किती करता येते गुंतवणूक?

तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत रु. 1,000 ते रु. 30 लाख रुपये गुंतवता येतील. यापूर्वी गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत होती, ती आता वाढवली आहे. जर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही रोख पैसे देऊन खाते चालू करू शकता. पण तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केले तर तुम्हाला चेक द्यावा लागेल. तुम्ही एकापेक्षा जास्त खाती चालू करू शकता, परंतु एकूण गुंतवणुकीची रक्कम ३० लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

परतावा

या योजनेमध्ये ८.२ टक्के व्याज उपलब्ध असून यात गुंतवणुकीची रक्कम पाच वर्षांनी परिपक्व होते. गुंतवणुकीची मुदत तीन वर्षांसाठीही वाढवता येते. समजा तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला एकूण 14.28 लाख रुपये मिळतील. यामध्ये प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवरही कर सवलत मिळेल.

SCSS की FD?

SCSS की FD? कोणती गुंतवणूक तुमच्या फायद्याची आहे. तर या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्षात तुमच्या गरजेवर आणि तुम्ही किती काळ गुंतवणूक करू इच्छिता यावर अवलंबून आहे. समजा तुम्हाला एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी FD जास्त चांगली असू शकते. पण जर तुम्हाला यापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास तुमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा चांगला पर्याय आहे.

तुम्हाला १ वर्षाच्या एफडीवर ६.९ टक्के व्याज मिळेल. २ आणि ३ वर्षांच्या एफडीवर ७ टक्के दराने व्याज आणि ५ वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के दराने व्याज मिळेल. SCSS तुम्हाला ८.२ टक्के जास्त व्याजदर देईल.

Leave a Comment