Post Office । पोस्टाची भन्नाट स्कीम! अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास होईल 12 लाखांपर्यंत फायदा

Post Office । सर्वसामान्य नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. या गुंतवणुकीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक लाभ होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजनेत चांगला आणि सुरक्षित परतावा मिळतो.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची अशीच एक योजना आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना लाखो रुपयांचा फायदा होतो. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत चांगले व्याज दिले जाते.

हे लक्षात घ्या की योजना ही एक डिपॉझिट स्‍कीम आहे. यामध्ये 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख गुंतवता येते, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. सध्या, या योजनेत 8.2 टक्के व्याज मिळते.

तुम्हाला या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख जमा करता येते. जर तुम्ही ही रक्कम या योजनेत गुंतवली तर तुम्हाला 5 वर्षात 8.2% दराने 12 लाख 30 हजार व्याज दिले जाते. प्रत्येक तिमाहीत 61,500 व्याज म्हणून जमा करण्यात येतात. 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 42 लाख 30 हजार मॅच्युरिटी रक्कम मिळते.

समजा तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 15 लाख रुपये जमा केल्यास सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 5 वर्षात 6 लाख 15 हजार रुपये व्याज दिले जाते. व्याजाची तिमाही आधारावर गणना केली तर दर तीन महिन्यांनी 30,750 व्याज मिळेल.15 लाख आणि 6 लाख 15 हजारांची व्याजाची रक्कम जोडून एकूण 21 लाख 15,000 रुपये मॅच्युरिटी रक्कम मिळते.

Leave a Comment