ही योजना पाहिलीत का?… मिळतील दरवर्षी १ लाखाहून अधिक रूपये
Post office savings scheme सध्या पैसे कमावण्याबरोबरच पैशांची बचत करणे ही सुध्दा एक कमाईच आहे. त्यामुळे आपल्या मासिक कमाईतून काही विशिष्ट रक्कम बचत करण्याची सवय तुम्हाला निवृत्तीकाळात आर्थिक आधार देऊ शकते. आजकाल अनेक योजना व गुंतवणुकीचे अनेक पर्याय समोर आहेत, मात्र विश्वासार्ह योजनेची निवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोस्ट विभागाच्या गुंतवणूक योजनेतंर्गत एक चांगली संधी आहे. या योजनेत पैशांची बचत केल्यास त्यातून दरवर्षी एक लाख ११ हजार रूपये मिळू शकतात.
पोस्ट खात्यातर्फ बचतीच्या विविध योजना सुरू आहेत. हा सरकारी विभाग असल्याने आपण यामध्ये विश्वासाने गुंतवणूक करू शकतो. इतर वित्तीय संस्था. काही बँका किंवा पतसंस्थांमध्ये बरेच गुंतवणूक धोकादायक ठरू शकते, मात्र पोस्ट विभागच्या बाबतीत कोणतीही फसवणूक होत नसल्याने पोस्टात बचत खाते उघडण्याचा कल गेल्या काही वर्षात वाढला आहे.
investment plan पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत केली जाणारी गुंतवणूक फायदेशीर ठरणारी आहे. यामध्ये तुम्ही एकट्याचे किंवा पती पत्नी दोघांचे खाते सुरू करू शकता. या खात्यातील बचतीद्वारे दर महिन्याला ९ हजार २५० रूपये म्हणजेच एक लाख ११ हजार इतकी रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजनेत एका खात्यात वर्षाला ९ लाख रूपये जमा करणे आवश्यक आहे. तर संयुक्त खाते असेल तर वर्षाला १५ लाख रूपये जमा करू शकता. यावर ७.४ टक्के दराने व्यास मिळते. या योजनेत ५ वर्षापर्यत रक्कम जमा केली की पुढे दरवर्षी एक लाख ११ हजार रूपये खात्यात जमा होत राहतील. या योजनेचा फायदा निवृत्तीनंतर होतो. १० वर्षापुढील वय असलेल्या मुलांच्या नावेही ही योजना सुरू करता येते.
या योजनेत जी रक्कम जमा करायची आहे ती दरमहा जमा करण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे मासिक कमाईतून बचत करणे सोपे होते. या योजनेचा फायदा घेतल्यास तुमचा निवृत्तीकाळ आर्थिकदृष्ट्या छान जाईल.