Post Office : सध्याच्या काळात पैशांच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला आहे. बहुतांश लोक गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराकडे (Share Market) वळत असले तरी शेअर बाजाराची स्थिती कधीच स्थिर नसते आणि येथे जोखीमही जास्त आहे. येथे गुंतवणूक करणे जोखमीपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस (Post Office) हे एक असे माध्यम आहे की जिथे आपला पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि परतावा देखील चांगला आहे. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक बचत योजना आहेत ज्यात वार्षिक 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. येथे आपण पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटबाबत (RD) माहिती घेणार आहेत. या योजनेतील पैसे गुंतवणूक (Investment) तुमच्यासाठी निश्चित फायदेशीर ठरू शकेल.

या योजनेच खास वैशिष्ट्य म्हणजे कामकाज सरकारच्या देखरेखीत चालते. त्यामुळे पैशांचे नुकसान होण्याचा कोणताच धोका नाही. तुम्ही या खात्यात काही पैसे जमा करूनही मोठा निधी उभा करू शकता. आरडी खाते फक्त 100 रुपये जमा करूनही सुरू करता येते. सध्या या योजनेवर 5.8 टक्के व्याजदर आहे. आरडी खात्यात पैसे जमा करण्यासाठी कमाल मर्यादा नाही. RD तुमच्या सोयीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी उघडता येते. त्यात जमा केलेल्या पैशावर तिमाही व्याज मिळते. प्रत्येक तिमाहीच्या शेवटी तुमच्या खात्यात चक्रवाढ व्याज (Interest) जमा केले जाते.

पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्यावतीने देखील उघडले जाऊ शकते. जर 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन असेल तर त्याच्या नावावरही खाते उघडता येईल. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील. म्हणजेच, जर तुम्ही दरमहा 10000 रुपये ठेवले आणि 5.8 टक्के दराने व्याज मिळाल्यास, तुम्हाला 10 वर्षांनंतर 16,28,963 रुपये मिळतील. आरडीमध्ये कर्जाचीही सुविधा आहे. 12 हप्ते जमा केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध होईल.

 

Share.

Leave A Reply

Exit mobile version