Post Office : पोस्टाच्या ‘या’ धमाकेदार योजनेत पैसे गुंतवा आणि डबल पैसे मिळवा, जाणून घ्या मालामाल करणाऱ्या योजनेबद्दल

Post Office : काहीजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये पैसे गुंतवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या जोखीममुक्त असतात. तसेच या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास परतावा देखील जास्त मिळतो. पोस्टाची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला दुप्पट फायदा होईल.

दरवर्षी गुंतवणूक: 10 लाख रुपये
कालावधी: 20 वर्षे
व्याज दर: 7.1%
गुंतवलेली एकूण रक्कम: रु. 2 लाख
एकूण व्याजाची कमाई: रु 2,43,886
मॅच्युरिटी रक्कम: रु 4,43,886

पोस्टाची पीपीएफ योजना

PPF योजनेमधील गुंतवणूक पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेतून सुरू करता येईल. तुम्ही एका आर्थिक वर्षात योजनेत किमान 500 रुपये जमा करता येईल. तर कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येऊ शकतात. गुंतवणूकदार 50 रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूक सुरू करता येईल. गुंतवणुकीच्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर कपात उपलब्ध असून आयटी कायद्यानुसार, व्याजाची रक्कम करमुक्त करण्यात आली आहे.

PPF वर EEE कर सवलत

पीपीएफ कराच्या ईईई श्रेणी अंतर्गत येतो. म्हणजे, या योजनेत गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ घेता येईल. इतकेच नाही तर त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमदेखील करमुक्त आहे. असे असल्याने दीर्घकालीन फायद्यांच्या दृष्टीने पीपीएफ गुंतवणूक चांगली मानली जाते.

5 वर्षांचा लॉक इन कालावधी

पीपीएफ खात्यात पैसे काढण्यापूर्वीचा लॉक इन कालावधी ५ वर्षांचा ठेवला आहे. म्हणजे ज्या वर्षात खाते चालू केले जाते त्या वर्षानंतर या खात्यातून 5 वर्षे पैसे काढता येत नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून प्री-विड्रॉवल करता येईल. इतकेच नाही तर 15 वर्षापूर्वी मॅच्युरिटी काढता येत नाही.

Leave a Comment