Post Office : पोस्टाची धमाकेदार स्कीम! पती-पत्नीला दरमहा करता येईल हजारोंची कमाई

Post Office : अनेकजण आपल्या सुरक्षित भविष्यासाठी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजना अशा आहेत, ज्यातून गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येते. अशीच पोस्टाची एक योजना आहे. या योजनेअंतर्गत आता पती-पत्नीला चांगली कमाई करता येईल.

हे लक्षात घ्या की POMIS योजनेमध्ये पैसे 5 वर्षांसाठी जमा करण्यात येतात. या रकमेवर मिळालेल्या व्याजातून तुम्ही कमावता आणि तुमची जमा केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. या योजनेतून संयुक्त खात्याद्वारे 9,250 रुपयांपर्यंत कमाई करता येईल. सेवानिवृत्त लोकांसाठी ही योजना अतिशय चांगली असून पती-पत्नीने एकत्र गुंतवणूक केली तर त्यांना स्वतःसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करता येईल.

संयुक्त खाते

सध्या, POMIS मध्ये 7.4% दराने व्याज उपलब्ध असून समजा तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला एका वर्षात 7.4 टक्के व्याजाने 1,11,000 रुपये हमी मिळते. 5 वर्षात तुम्हाला 1,11,000 x 5 = 5,55,000 रुपये व्याजातून मिळू शकतात. 1,11,000 रुपयांचे वार्षिक व्याज उत्पन्न 12 भागांमध्ये विभागल्यास ते 9,250 रुपये येईल. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमचे उत्पन्न 9,250 रुपये असते.

किती होते कमाई?

समजा तुम्ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत एकच खाते चालू केले आणि त्यात 9 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला एका वर्षात 66,600 रुपये व्याज मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पाच वर्षांत 66,600 x 5 = 3,33,000 रुपये मिळवता येतील. अशा प्रकारे, तुम्हाला फक्त व्याजातून रु. ६६,६०० x १२ = रु ५,५५० प्रत्येक महिन्याला कमवू शकता.

कोणाला चालू करता येते खाते?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणत्याही देशाच्या कोणत्याही नागरिकाला खाते चालू करता येते. तुम्ही आता मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. जर मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. मूल 10 वर्षांचे झाले तर त्याला स्वतः खाते चालवण्याचा अधिकार मिळू शकतो. एमआयएस खात्यासाठी, तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असावे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड देणे अनिवार्य आहे.

Leave a Comment