Post Office : जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनांमध्ये चांगला परतावा मिळेल. पोस्टाच्या काही जबरदस्त योजना आहेत, ज्यात तुम्हाला गुंतवणुकीवर शानदार परतावा मिळेल.
अशी बचत योजना शोधण्याचा विचार करा जी तुम्हाला कमी गुंतवणुकीवरही चांगले व्याज मिळवून देईल. पोस्ट ऑफिसच्या या 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून जितके व्याज कमावता येईल तितके व्याज बँक बचत खात्यात तुम्हाला देणार नाही.
तसेच या ठिकाणी तुमचे पैसे सुरक्षित राहतील. तुम्हाला चांगला परतावाही मिळेल. विशेष म्हणजे तुम्ही यापैकी काही योजनांमध्ये फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येईल. जर तुम्हाला फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी करू शकता. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिस आरडी
हे लक्षात घ्या की सध्या सरकार पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7 टक्के व्याज देत असून ही एक प्रकारची पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागणार आहे. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये हे किमान 100 रुपये असते. ही योजना तुम्हाला किमान ५ वर्षे चालवावी लागणार आहे.
हे लक्षात घ्या की, पोस्ट ऑफिस आरडी व्यतिरिक्त, तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. कारण यात तुम्हाला चांगले उत्पन्नही मिळते. त्याचबरोबर तुमची गुंतवणूकही सुरक्षित राहते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सारख्या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागणार आहेत. यावर सरकारकडून ७ टक्के व्याज देण्यात येते. तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण पैसे मिळतील.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिसची एक चांगली बचत योजना असून लोकांना ७.६ टक्के व्याज मिळते.
किसान विकास पत्र
त्याचप्रमाणे किसान विकास पत्र मध्ये लोकांना 7.2 टक्के व्याज देण्यात येत आहे.
राष्ट्रीय मासिक उत्पन्न योजना
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय मासिक उत्पन्न योजना खाते चालू करू शकता. तुम्हाला यात किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होते. या खात्यावर तुम्हाला ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळेल.