Post Office : पोस्टाची जबरदस्त योजना! गुंतवणुकीवर होणार दुप्पट फायदा

Post Office : पोस्ट ऑफिस अनेक योजना सुरु करत असते. ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. अशीच एक पोस्टाची योजना आहे ज्यात तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो. तसेच या योजनेत थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता. तुम्हालाही कमी वेळेत चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करू शकता.

1000 रुपयांपासून करा गुंतवणूक

  • किसान विकास पत्र योजनेतील गुंतवणूकीची रक्कम 1000 रुपये असून योजनेमध्ये १०० च्या पटीत गुंतवणूक करता येते.
  • या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नसून या योजनेत अनेक खाती उघडता येतात.

कोणाला करता येते गुंतवणूक

  • कोणत्याही भारतीय नागरिकाला किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करता येते.
  • एकल प्रौढ किंवा जास्तीत जास्त 3 लोकांसाठी संयुक्त खाते चालू करता येते.
  • 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी पालक खाते चालू करू शकतात.
  • 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या नावावर खाते चालू करू शकतात.

या योजनेत 1 जानेवारी 2024 पासून 7.5% चक्रवाढ व्याज देण्यात येते. इंडियन पोस्टच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, योजनेतील ठेव रक्कम 9 वर्षे आणि 7 महिन्यांत म्हणजे 115 महिन्यांत दुप्पट होते.

या अटींवर बंद करता येते खाते

  • या योजनेशी संबंधित खाते कोणत्याही न्यायालयाच्या आदेशानंतर मुदतीपूर्वी बंद करता येते.
  • खातेधारकाच्या मृत्यूनंतर एकल आणि संयुक्त खाती मुदतीपूर्वी बंद करता येतात.
  • पैसे जमा केल्यानंतर 2 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर खाते मुदतीपूर्वी बंद करता येते.

Leave a Comment