Post Office : अवघ्या 333 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 16 लाखांचा परतावा, काय आहे पोस्टाची शानदार योजना? जाणून घ्या

Post Office : जर तुम्हाला कमी वेळेत जास्त परतावा पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप कामाची आहे. तुम्ही आता पोस्ट ऑफिसच्या या योजनेत 333 रुपये गुंतवणूक करून 16 लाखांचा परतावा मिळवू शकता. काय आहे पोस्टाची शानदार योजना? जाणून घ्या.

अशीच एक योजना आहे ज्यामध्ये दररोज ३३३ रुपये जमा करून तुम्ही १६ लाख रुपये जमा करू शकता. ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम आहे जी गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा देते.

मिळतील 10 वर्षात 16 लाख रुपये

विशेषत: मध्यमवर्गीय घरांमध्ये बचतीचे विविध प्रकारचे पर्याय पाहायला मिळतात, यात पिगी बँकेचाही समावेश आहे. तुम्ही पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्ही 10 वर्षात 16 लाख रुपये जमा करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीम चालवल्या जातात. ज्यात रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच RD ही त्यापैकी एक आहे.

100 रुपयांनी चालू करा खाते

तुम्ही तुमचे खाते या आवर्ती ठेव खात्यात म्हणजेच RD मध्ये चालू करू शकता, जे पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम लहान बचत योजनांमध्ये समावेश आहे. तुम्ही दरमहा १०० रुपये गुंतवून हे खाते सुरु करू शकता. यामध्ये एकल किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा दिली आहे. आपण व्याजाबद्दल बोललो तर, सध्या या योजनेवर 6.7 टक्के मजबूत चक्रवाढ व्याज देण्यात येत आहे आणि हा नवीन व्याज दर 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला आहे.

जोखीममुक्त गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या इतर सर्व बचत योजना जोखीममुक्त असून यामध्ये सरकार गुंतवणुकीवर सुरक्षिततेची हमी देते. पण या स्मॉल सेव्हिंग्स आरडी स्कीममध्ये खूप फायदे आहेत, तुम्हाला दर महिन्याला योग्य वेळी गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण जर तुम्ही कोणत्याही महिन्यात हप्ता भरायला विसरलात तर तुम्हाला दरमहा 1% दंड बसेल. तसेच तुम्ही सलग 4 हप्ते चुकवले तर हे खाते आपोआप बंद होईल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्ष इतका आहे.

असे मिळतील 16 लाख रुपये

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 16 लाख रुपये कसे उभे करू शकता. तुम्ही या स्कीममध्ये दररोज 333 रुपये गुंतवल्यास ही रक्कम दर महिन्याला अंदाजे 10,000 रुपये इतकी होते. असे केले तर तुमचे दरवर्षी 1.20 लाख रुपये वाचतील. म्हणजेच तुम्ही पाच वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीत 6 लाख रुपये जमा करू शकता. आता जर आपण 6.7 टक्के दराने चक्रवाढ व्याज बघितले तर ते 1,13,659 रुपये होतील. म्हणजेच तुमची एकूण रक्कम 7,13,659 रुपये होईल. .

योजनेमध्ये मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असला तरी तुम्हाला तो आणखी पाच वर्षांसाठी वाढवता येईल. म्हणजेच तुम्ही याचा लाभ 10 वर्षांपर्यंत घेऊ शकता. आता 10 वर्षांत तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कम 12,00000 रुपये असणार आहे आणि त्यावर मिळणारे व्याज 5,08,546 रुपये इतके असणार आहे. आता व्याज जोडल्यानंतर 10 वर्षानंतर तुम्हाला एकूण 17,08,546 रुपये मिळतील.

Leave a Comment