Politics News : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारीवरून राजकारण तापले आहे. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीने (CWC) सोनिया गांधींना (Sonia Gandhi) पत्र लिहून पक्षाध्यक्षपद शर्यतीतून गेहलोत यांचे नाव मागे घेण्याची मागणी केली आहे. यासाठी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांऐवजी दुसऱ्याला उमेदवारी द्यावी, असे सीडब्ल्यूसीचे म्हणणे आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राजस्थानमधील (Rajasthan Poitical Crisis) अलीकडच्या राजकीय घडामोडी आणि गेहलोत छावणीच्या आमदारांच्या वागणुकीमुळे CWC सदस्य नाराज आहेत. त्यांच्याविरोधात त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली आहे. ते म्हणतात, “त्यांच्यावर (गेहलोत) विश्वास ठेवणे आणि त्यांना जबाबदारी देणे चांगले होणार नाही.” पक्ष नेतृत्वाने त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार करावा.
ज्येष्ठ आणि गांधी घराण्याशी प्रामाणिक असलेल्या नेत्याला पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याची मागणी CWC सदस्यांनी केली आहे. दुसरीकडे राज्यात काँग्रेसची (Congress) अवस्था बिकट होताना दिसत आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन (Ajay Makan) यांना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दूत म्हणून पाठवण्यात आले होते. दोन्ही संदेशवाहक आमदारांशी बोलण्यात आणि गेहलोत छावणीचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात अपयशी ठरले. अजय माकन यांनी दिल्लीत परतण्यापूर्वी सर्व काही मीडियासमोर सांगितले. जे घडले ते अनुशासनहीन असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी मुख्यमंत्र्यांच्या घरी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याची माहिती आहे, मात्र त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गटातील आमदारांनी संसदीय कामकाज मंत्री शांती धारीवाल यांच्या बंगल्यावर बैठक घेतली. यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्याकडे राजीनामा (Resignation) सुपूर्द केला.
200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे 108 आमदार आहेत. पक्षाला 13 अपक्ष उमेदवारांचाही पाठिंबा आहे. गेहलोत गटातील काही आमदारांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी असा असावा ज्याने 2020 मधील राजकीय संकटाच्या वेळी सरकार वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कोणीही यामध्ये नसावा ज्याने त्यावेळी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता.