मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. यादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप झाले. पण संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हा उत्साह मातोश्रीवर देखील पहायला मिळाला. साधारण १०० दिवसांनी जामीन मिळाल्यानंतर ते आज (१० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी संजय राऊत यांचे स्वागत करण्यासाठी आदित्य ठाकरे घराबाहेर आले. विशेष म्हणजे संजय राऊतांजवळ येताच आदित्य ठाकरे यांनी त्यांची आनंदाने गळाभेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊत यांना मातोश्रीवर घेऊन गेले. संजय राऊत जामिनावर बाहेर आल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरे समर्थकांकडून कालपासून राज्यभरात जल्लोष केला जात आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या स्वागतासाठी खुद्द आदित्य ठाकरे घराबाहेर आले होते. यावेळी संजय राऊतांजवळ पोहोचताच त्यांनी राऊतांची आनंदाने गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
must read
- अय्योव, तंत्रज्ञान जगतात नवीन क्रांती; पहा कसा आहे एलजी कंपनीचा चुरडा-मुरडा होणारा डिस्प्ले
- Dosa recipe :उरलेल्या ब्रेडपासून बनवा स्वादिष्ट डोसा, “ही “आहे त्याची झटपट आणि सोपी रेसिपी