Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये; सोनिया गांधी- प्रशांत किशोरांची भेट; लवकर होणार मोठी घोषणा

नवी दिल्ली: काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या प्रस्तावावर आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या गेम प्लॅनवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या निवडक सहकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. विशेष म्हणजे सोमवारी प्रशांत किशोरही सोनियांना भेटायला पोहोचले होते, गेल्या तीन दिवसांतील त्यांची ही दुसरी भेट आहे. याआधी शनिवारी त्यांची भेटही झाली आणि प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या काही बड्या नेत्यांसमोर मिशन 2024 च्या विस्तृत आराखड्याचे सादरीकरण केल्याचे कळते.

Advertisement

यावेळी प्रशांत किशोर यांनी एक प्रस्ताव आणला आहे ज्या अंतर्गत काँग्रेस 370 जागांवर निवडणूक लढवू शकते आणि काही राज्यांमधील जागांवर मित्र पक्षांसोबत युती करू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, प्रशांत किशोर यांनी यूपी, बिहार आणि ओडिशामध्ये काँग्रेसने एकट्याने लढावे, तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात युती करावी, असे सुचवले आहे. या सूचनेला राहुल गांधीही सहमत आहेत. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी काँग्रेसकडे 2 मे पर्यंत वेळ असल्याचे सूत्रांकडून समजते.

Advertisement

10 जनपथ रोड येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी यांच्या कन्या आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाडा, पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, रणदीप सिंग सुरजेवाला आणि अंबिका सोनी उपस्थित होते. मात्र, राज्यांमध्ये काँग्रेसचे थेट प्रतिस्पर्धी असलेल्या आणि देशातील सर्वात जुन्या पक्षाशी चांगले संबंध नसलेल्या नेत्यांशी हातमिळवणी करत असल्याने प्रशांत किशोर आणि त्यांच्या प्रस्तावाबाबत काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या नेत्यांमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

प्रशांत यांच्या आयपीएसी संस्थेने ममता आणि जगनमोहन यांची निवडणूक प्रचार मोहीम यशस्वीपणे पार पाडली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांच्या गांधी कुटुंबासोबत झालेल्या भेटीनंतर, गेल्या आठवड्यात त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना वेग आला होता, परंतु या मुद्द्यावर अंतिम करार होऊ शकला नाही. मात्र, यावेळी प्रशांत किशोर यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी गांधी घराण्याकडे मोर्चा वळवला असल्याचे सूत्रांकडून समजते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply