भुजबळ निर्दोष; मात्र ईडीच्या निरीक्षणाने राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्याचं टेन्शन वाढलं..वाचा काय आहे कारण
खडसे यांनी रेडी रेकनर पेक्षा खूपच कमी बाजारमुल्य दाखवून जमीनीती खरेदी केल्याचा आरोप आहे. मात्र आता या प्रकरणात ईडी कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे खडसेंच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे : भ्रष्टाचाराच्या आरोपात भाजपाच्या बाणांनी घायाळ होत राष्ट्रवादीचे अनेक नेते अडचणीत येत आहेत. मात्र महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल देत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना दोषमुक्त केले आहे. मात्र दुसरीकडे ईडीने नोंदवलेल्या निरीक्षणानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं टेन्शन वाढलं आहे.
भाजपा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा (ED) वापर करत असल्याची टिका विरोधकांकडून केली जाते. मात्र पुर्वाश्रमीचे भाजपा नेते आणि फडणवीस सरकारमध्ये महसुलमंत्रीपद भुषवलेले एकनाथ खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत. खडसे महसुलमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी परीसरातील 3.1 एकर प्लॉट खरेदी केला होता. 2016 मध्ये खडसे यांनी 31 कोटी रूपये किंमतीचा भुखंड अवघ्या 3.7 कोटी रूपयांना खरेदी केला होता. त्यामुळे खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
खडसे यांनी रेडी रेकनर पेक्षा खूपच कमी बाजारमुल्य दाखवून जमीनीती खरेदी केल्याचा आरोप आहे. मात्र आता या प्रकरणात ईडी कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणामुळे खडसेंच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडी कोर्टाने एकनाथ खडसे प्रकरणात निरीक्षण नोंदवताना म्हटले आहे की, खडसे यांनी मंत्रीपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटूंबातील लोकांना पदाचा फायदा करून दिला. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही. अन्यथा त्यामुळे समाजात वाईट संदेश जाईल.
तर भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना 6 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर 13 तास कसून चौकशी करून ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या. तर दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतरही खडसेंच्या जावयाला जामीन मिळाला नाही. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भुजबळांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं टेन्शन वाढायला सुरूवात झाली आहे.