पुणे : अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. फिकी महिला आघाडी मार्फत राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुष्काळ तसेच उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आणि राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
शेतकर्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. ओला दुष्काळ जाहीर न करता देखील आज आम्ही मदत करीत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्यास केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम असतात. हेच ‘उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी ५० हजार रुपये इतकी मदत शेतकर्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी करीत होते. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्यांना एकदा तरी मदत केली का ? ते एकदा तरी शेतकर्याच्या बांधावर गेले का ? औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे गेले आणि तिथे ते किती तास होते तर केवळ २६ मिनिटे होते. अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं’ असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. देशात १९२७ पासून फिकी उद्योग व्यवसायात काम करीत आहे. आपल्या देशात नवनवीन तंत्रज्ञान याव यासाठी फिकी काम करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महिला उद्योजकांच्या दृष्टीने फिकीने कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.
must read
- Political News: कॉंग्रेसने केलाय सर्व्हे; पहा त्यात नेमके किती आमदार झालेत नापास
- spinach recipe :”अशी” बनवा स्वादिष्ट ‘स्पिनच एग करी’ भात किंवा रोटीची चव नक्कीच वाढेल