पुणे : सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जगदंब’ तलवारी बाबत महत्वाची माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. असे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार सांगितले आहे. तसेच, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर याबाबत केंद्र सरकारकडे विनंती केल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना ”ब्रिटीश सरकारने मोठ्या मनाने ती तलवार परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकाने प्रयत्न करायणला हवे, अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. ते आज साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणतात “संपूर्ण जग भरात प्रत्येकाच्या भावना शिवरायांच्या ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ तलवारीशी जुळल्या आहेत. प्रत्येकाला वाटते की ती भारतात यावी. ती सध्या इंग्लंडमध्ये जिथे ठेवली आहे, तिथे प्रचंड सुरक्षा आहे. मी स्वत: ते सर्व बघितलं आहे. ती तलवार आता मोठ्या मनाने ब्रिटीश सरकारने परत करायला हवी, त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे”, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. जगदंब तलवार बाबत बोलत असताना त्यांनी काल प्रतापगडाच्या पायथ्याशी असेलल्या अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवण्यासंदर्भातही प्रतिक्रिया दिली. “शिवाजी महाराजांचा आयुष्यभराचा प्रवास जर आपण बघितला, तर त्यांनी नेहमीच प्रत्येकाचा मान सन्मान केला. त्यांच्यावर हल्ला करायला आलेल्या माणसाला तिथे जागा दिली. त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. मात्र, इतका मोठा विचार आपण कोणीच करू शकलो नसतो. पण त्यांनी केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधली. आज त्याला एवढे वर्ष लोटून गेले. ती खरं तर आता मोकळी केली पाहिजे. तो इतिहास आपल्या पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवला पाहिजे. त्याठिकाणी जे बांधकाम झालं आहे. ते वनविभागाच्या जागेवर आहे. ते एकप्रकारे अतिक्रमण होतं. त्यामुळे अतिक्रमण म्हटल्यावर शासनाने जी कारवाई करायला हवी.
must read
- Testy recipe : एकदा बनवून आठवडाभर ‘मिक्स व्हेज भाखरवडी’ चा आस्वाद घेऊ शकता, जाणून घ्या त्याची झटपट रेसिपी
- Amit Shah in Mumbai: शाह यांनी केले ‘त्याचे’ कौतुक; पहा मुंबई गणपती भेटीमधील क्षणचित्रे