मुंबई: ‘विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.’हा यु टर्न आता चालणार नाही @ देवेंद्र फडणवीस असं सुप्रिया सुळेंनी ट्वीट केलं आहे. त्यात दोन व्हीडीओ देखील शेअर केले आहे. त्यात सत्तेत येण्यापुर्वी आणि सत्तेत आल्यावर असे कॅप्शनही दिले आहे.
सत्तेत येण्यापूर्वीच्या व्हि़डिओत फडणवीस म्हणाले आहेत की, “मला मध्यप्रदेश सरकारचं अभिनंदन करायचं आहे. कारण, मध्यप्रदेश सरकारने ६ हजार ५०० कोटी स्वत: देऊन, शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केली आहेत. महाराष्ट्रात मात्र रोज सावकारी पद्धतीने, विजेची बिलं वसूल केली जात आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील मध्यप्रदेश प्रमाणे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचे पैसे महावितरणला द्यावेत, अशी आमची मागणी आहे.” याचबरोबर फडणवीस सत्तेत आल्यानंतरचा जो व्हिडिओ सुप्रिया सुळेंनी दाखवला आहे, त्यामध्ये फडणवीस “कृषी पंपाच्या संदर्भात वसूली आपली सुरूच असते. त्यात काही प्रमाणात तक्रारी येत होत्या की आमचे कनेक्शन कापले जात आहेत. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यामुळे आता रब्बीच्या पेरण्या करणं किंवा आता जे पीक घेता येईल, तो प्रयत्न त्यांचा चाललेला असताना मी असं सांगितलं आहे की, जे बील भरू शकतात त्यांनी बील भरलं पाहिजे. पण जे अडचणीत आहेत, त्यांनी चालू बील जरी भरलं तरी त्यांना सध्या सूट देण्यात यावी त्यांचं कनेक्श कापण्यात येऊ नये, भविष्यात त्यांच्याकडून आपल्याला वसूली करता येईल. त्यामुळे आता ज्या भागात अतिवृष्टी झालेली आहे, अशा भागात सक्तीने वसुली न करता केवळ एक बील त्यांच्याकडून घेऊन आता कनेक्शन तोडणं बंद करायला पाहिजे.” असं म्हणतांना दिसत आहेत.
must read