मुंबई: १९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे, त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावीच लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. राज्यपालांनी शिवरायांसंदर्भात केलेल्या विधानानंतर महाविकास आघाडीकरून राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरून संजय राऊत यांनीही भाजपावर सडकून टीका केली आहे
“१९ तारखेला विधानसेभेचे अधिवेशन आहे. त्यापूर्वी राज्यपालांवर कारवाई करावे लागेल. आशिष शेलार म्हणतात, ‘अरे’ ला ‘कारे’ करतो. मात्र, आधी शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या राजभवात जाऊन त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कीटं न खाता त्यांना विचारा ‘कारे’ तुम्ही शिवरायांचा अपमान करता? आधी ‘कारे’ तिथे विचारा, मग बाकीच्या गोष्टी करा, पण तुमच्या मनगटात तेवढी ताकद नाही. रोज उठून शिवरायांचा अवमान करता, त्यांचा इतिहास तुडवता”. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानाचाही समाचार घेतला. “शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, काल भाजपाने नवा शोध लावला आहे. त्यांनी शिवनेरीवर फुली मारली आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकले आहे. मुळात त्यांना शिवाजी महाराज तरी मान्य आहेत का?” यांच उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावं लागेल”, असे ते म्हणाले.
must read