मुंबई : मुंबईतील राजगृह येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या भेटीत काय झालं हे त्यांनी सांगितलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती.”
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “राजगृहाची ही इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. आर्किटेक्चर नसतानाही बाबासाहेबांनी कोणत्याही खांबाशिवाय उभी केली. राजगृहमध्ये बाबासाहेबांच्या वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, बसण्याची खुर्ची, सर्व पुस्तकं आणि इतर सर्व बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाहिल्या. त्या आजही जशाच्या तशा आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे.”
must read
- अन्.. देवाने मला बुद्धी दिली… नाहीतर.. जामीन मंजूर झाल्यावर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
- Masala Dosa: नाश्त्यात काहीतरी खास करून पहायचे आहे, तर बनवा हेल्दी डोसा