मुंबई:काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज ( ७ डिसेंबर ) संपन्न झाला. कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचं सत्यजित तांबे यांनी अनुवाद केला. या पुस्तकप्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळतं. आशिषजी यांना प्रश्न पडला, सत्यजित तांबे परदेशात का शिकायला गेले? पण, आपल्या लोकशाहीत सर्व निर्णय राजकीय नेते घेतात. त्यामुळे ते जेवढे प्रगल्भ आणि माहिती ठेवणारे असतील, तेवढे चांगले निर्णय घेतात.” पुढं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते, तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात,” असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबेंना एकप्रकारे भाजपात येण्याची ऑफरच दिली.
must read