मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “टीका करणाऱ्यांनी आपलं कर्तुत्व काय आहे याचा आधी विचार करावा,” असा हल्लाबोल राऊतांनी केलायं ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. पुढे ते म्हणतात “शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं भाजपाच्या नेत्यांचं काम झालंय. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवं.” टिकाकारांनी आपलं कर्तुत्व काय याचा विचार करावा “शरद पवार व उद्धव ठाकरे हे देशाचे प्रमुख नेते आहेत. अशी चिखलफेक करणाऱ्यांनी याचं भान ठेवावं.
संजय राऊत पुढे म्हणतात, “आपल्या हातात अमर्याद सत्ता आहे म्हणून ते आमच्या नेतृत्वावर अशी विधानं करत आहेत. त्यांनी काय विधान केलंय मला माहिती नाही, मला माध्यमांकडून माहिती मिळतीय. मात्र, अशी विधानं कोणीही करू नये. आम्ही करत नाही, तुम्हीही करू नये. तुम्ही अशी विधानं केली, तर मग आम्ही आहोतच.” राऊतांवर अनेक टिका झाल्या आता जामीन मिळाल्यानंतर प्रत्येक टिकेला ते जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहे.
must read
- Best Winter Destinations: हिवाळ्यात भेट देण्यासाठी ” ही ” ठिकाणे एक्सप्लोर करा ;आनंद होईल द्विगुणित
- Pumpkin recipe :भोपळ्याची भाजी आरोग्यासाठी आहे फायदेशीर, “अशा” पद्धतीने बनवा की प्रत्येकजण रेसिपी विचारेल