मुंबई : “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी” अशी टिका काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर त्यांच्या अटके दरम्यान केली होती. संजयराऊतांना आता जामीन मिळाला आहे. आज संजय राऊतांनी या टिकेवर भाष्य केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना संजय राऊतांवर ईडीच्या कारवाई विषयी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर देताना त्यांनी राऊतांना खोचक सल्ला दिला होता. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी” असे ते म्हणाले होते.
must read
- Rise Recipe : भात उरलाय !बनवा “ही” चविष्ट डिश, काही मिनिटांत होईल तयार
- ‘ती’ ची राजकारणात होणार एंट्री ; काँग्रेस नेत्याचे ट्वीट