मुंबई ; बेळगाव, निपाणीसह सीमाभागातील काही गावे महाराष्ट्रात असावीत की कर्नाटकमध्ये, यावरून दोन्ही राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नसताना आता कर्नाटक सरकारने थेट सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातली ४० गावं आपल्या हद्दीत घेण्याची तयारी सुरू केली आहे. असा दावा कर्नाटक सरकार करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्र बसवराज बोम्मई यांनी सीमाभागातील गावांवरून केलेल्या विधानांमुळे आणि ट्वीटमुळे हा प्रश्न अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्राचं सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल. पण आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना महाराष्ट्रावर आलेलं प्रत्येक संकट परतवून लावेल. १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही आणखीन हुतात्मे देऊ. रक्त सांडू. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्यानं ६९ हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही देत, धमकी देतोय समजा. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आमचं सरकार जरी सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका”, अशा शब्दांत राऊतांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
must read