मुंबई: राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकाही केली.
संजय राऊत म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहीले आहेत, ते छत्रपतींचे वंशज आहेत. उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना आहे, की शिवरायांचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का नाही आलं, ही त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली आहे. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे एका हतबलतेने त्यांचा अपमान पाहते आणि परत शिवप्रताप दिन साजरा करत आहेत हे ढोंग आहे.”अभिव्यक्ती स्वातंत्र्यात छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचा अवमान करण्याची मुभा आहे का, असा प्रश्न उपस्थित करत महापुरुषांचा अवमान केल्यास राष्ट्रद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी केली आहे. तसेच शिवाजी महाराजांबाबत झालेल्या अवमानकारक वक्तव्यांबाबत ३ डिसेंबरला रायगडावर समाधीस्थळी जाऊन आक्रोश व्यक्त करणार असून, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप ,प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
must read