मुंबई : शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते मंडळींनी शिंदे गटात उडी घेतल्याचे आपण पाहतोय. त्यात नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी “१०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय”. असे म्हणाले.
पुढे बोलताना “अमोल किर्तीकर कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत.त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही सल्ला दिला. “महाराष्ट्रातून प्रकल्प जात आहेत. यावर कुणीच काही बोलत नाहीये. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहेत? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र कमजोर झाला, तर आपण राजकारण करायलाही उरणार नाही याचं भान सत्ताधारी आणि विरोधकांनीही ठेवलं पाहिजे”, असंही ते म्हणाले.
must read
- Rise Recipe : भात उरलाय !बनवा “ही” चविष्ट डिश, काही मिनिटांत होईल तयार
- Pune Municipal Corporation : महापालिकेत साखळी बॉम्ब स्फोट