पुणे: कुणीही उठावं आणि टपलीत मारावं असाच प्रकार महाराष्ट्रात घडताना दिसतो आहे. आधी राहूल गांधींनी वीर सावकरांवर टिका केली. तर आता एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“छत्रपती शिवाजी महाराजांवर आता सुधांशू त्रिवेदी हा भाजपाचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललं आहे. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आली आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी रोहित पवार यांनी दिली आहे.
must read
- बाब्बो.. झालाच की घोटाळा; सावरकरप्रकरणी गांधींच्या वक्तव्याने पडणार उभी फूट..!
- स्वातंत्र्यसैनिकांना ‘दरमहा २० हजार’ रुपये निवृत्तवेतन तर… पहा ‘मंत्रिमंडळ बैठकीतले’ महत्त्वाचे निर्णय