मुंबई : पदाधिकाऱ्यांना काम करायचं नाही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पद खाली करावे आणि इतरांना काम करण्याची संधी द्यावी, असे राज ठाकरेंकडून सांगण्यात आले असल्याचे मनसे नेते बाळानांदगावकर यांनी सांगितले आहे. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमिवर मनसे ने बैठक आयोजित केली होती. प्रत्येक मतदार संघाची परिस्थिती नेमकी काय आहे? याचे अवलोकन करण्यासाठी वांद्रे येथे पदाधिका-यांची आजची बैठक होती. त्यासाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांना काही सुचनाही केल्या. तसेच काही ठिकाणी विभाग प्रमुख बदलण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार त्यांनी संबंधित ठिकाणी बदल करण्याचे आदेश राज ठाकरेंकडून देण्यात आले असल्याची माहिती”, मनसे नेते बाळानांदगावकर यांनी दिली.
यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याबाबत विचारले असता, अद्यापही तारीख निश्चित झाली नसून ती निश्चित होताच माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मनसेचा फोकस सध्या आगामी मुंबई महापालिका निव़डणुकीवर असल्याचे दिसते आहे. मनसे अनेक ठिकाणी कार्यकर्त्ये आणि पदाधिका-यांचे मेळावे घेताना दिसत आहे.
must read
- ‘ती’ ची राजकारणात होणार एंट्री ; काँग्रेस नेत्याचे ट्वीट
- Food recipe :घरी रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी बनवायची आहे , तर मग “ही” रेसिपी एकदा ट्राय कराच