मुंबई: मनसे नेते राज ठाकरे सध्या कोकण दौ-यावर आहे. कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत कसा पोहोचला आहे या बद्दल सांगितले. यावेळी राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडतात त्या आपल्यासमोर आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही दाखले, पत्रच नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहचावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांबरोबर कोण सहा लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही.”
“सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणं गरजेचं आहे. अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे,” असं आक्रमक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.त्याचप्रमाणे आगामी येणा-या वीर दौडले सात या सिनेमाविषयी देखील ते बोलले.
must read
- Insurance Tips : स्कूटर, दुचाकीसाठी विमा घेताय ? ; मग, ‘या’ गोष्टी विसरू नकाच; टळेल नुकसान
- पुणे रिक्षाचालकांच आंदोलन; राज ठाकरेंची भेट, ‘काय’ असणार मनसेची भुमिका