पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच काही वादग्रस्त वक्तव्येही केली होती. त्याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे.

त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे. आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते, आहेत आणि राहणारच……उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच धोतर फाडणार्‍यास किंवा फेडणार्‍यास १ लाख रोख रक्कम दिली जाईल अशी टीप या फ्लेक्सवर लिहिण्यात आली आहे. या बॅनरची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version