पुणे : राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे विधान सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी केले. पुण्यातील नवी पेठेतील पत्रकार संघात वास्तव कट्टा आणि अर्हम फाऊंडेशन यांच्या  वतीने स्पर्धा परीक्षार्थींसह संवाद कार्यक्रमात खोत बोलत होते.

खोत म्हणाले, दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन आयोजित केले पाहिजे. त्याचा फायदा होईल. राज्यकर्त्यांना सर्वांत जास्त भीती डोक्यांची वाटते. जिकडे जास्त डोकी, तिकड जास्त राज्यकर्ते बोलतात. कारण राज्यकर्ते हे एक रेड्याची औलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाही. तसेच त्यांना डोकी जास्त दिसली. तर ते आपोआप तुम्हाला नको असलेलेही  बोलून जातात. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेले बच्चू कडू म्हणाले सरकार कोणाचेही असले तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे देणारा तरुण पुढे जातो आणि अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपेल या कडे लक्ष दिले पाहिजे. आज बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्यावरचा विषय असला पाहिजे. सदाभाऊ राजकीय नेत्यांना रेडे म्हणाले, तरी हे रेडे लोकहिताचे असले पाहिजे.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version