मुंबई: सुषमा अंधारे यांची गुरुवारी मुलुंड येथे जाहीर सभा झाली. काहीजण ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असे लोकं आहेत, अशी टीका करत त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला बांधायला पैसे कुठून आले, याबाबतही सवाल विचारले. सुषमा अंधारेंच्या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारेंवर टीका करताना प्रकाश महाजनांची जीभ घसरली. सुषमा अंधारेंना बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदुला नारू झालाय का? असा सवाल महाजनांनी विचारला आहे. तसेच राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला याबद्दल विचारलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते. तसेच “काल सुषमा अंधारेंची सभा झाली. या बाईला काय बोलावं? हेच कळत नाही. मी बीड जिल्ह्यातला आहे, त्याही बीड जिल्ह्यातल्या आहेत. तिला बोलायला ठेवलं आहे, भुंकायला नाही. त्यांच्या मेंदूला नारू झाला का? राज ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी आपल्या मालकाला विचारलं पाहिजे?” अशी टोलेबाजी त्यांनी केली. कृष्णकुंज बंगल्याबाबत विचारलेल्या सुषमा अंधारेंनी विचारलेल्या सवालावर महाजन म्हणाले, “माझे नेते व्यवसाय करतात. शासनाचे सर्व नियम पाळून व्यवसाय करतात. ते भरपूर प्राप्तीकर भरतात. त्यांनी टोपल्याखाली झाकून बंगला बांधला नाही. पण त्यांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की, मातोश्री क्रमांक २ कशी बांधण्यात आली. १२६ कोटी बापाचे आणि ११ कोटी मुलाचे हे पैसे कुठून आले? ते काय धंदा करत होते का?” असा सवाल महाजनांनी विचारला.
must read