मुंबई : मेधा पाटकर यांनी सोमवारी (२८ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सरदार सरोवरबाबत सरकारने केलेले अनेक दावे खोडून काढले. मेधा पाटकर म्हणाल्या, “आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली कारण नर्मदा बचाव आंदोलनाविषयी जो खोटा प्रचार सुरू आहे त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. अन्यथा आम्ही पक्षीय राजकारणात नाही. मी कोणत्यांंही पक्षाची सदस्य नाही. निवडणुकीच्या राजकारणात सध्या मुल्यहिनता आली आहे. मतपेटीसाठी चुकीच्या गोष्टींचा आधार घेतला जात आहे.त्यात काही माध्यमांचाही समावेश आहे. ते सर्व वास्तव आम्हाला माहिती आहे.”
“केवळ मतदारांनाच नाही, तर संपूर्ण देशाची दिशाभूल करण्याचं षडयंत्र सुरू आहे. हे सर्व विकासाच्या नावाखाली सुरू आहे. त्यामुळे देशातील विस्थापितांसाठी आणि वंचित, शोषित,पीडितांसाठी अहिंसक सत्याग्रही संघर्ष करण्यासाठी जनतेपर्यंत सत्य पोहचवणं गरजेचं आहे,” असं मत मेधा पाटकर यांनी व्यक्त केलं. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेत्यांकडून नर्मदा बचाव आंदोलावर होणाऱ्या टीकेला मेधा पाटकर यांनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “आज नर्मदाचा मुद्दा इतका मोठा का झाला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मोदी सरकारमधील सर्व मंत्री इतके का घाबरले आहेत? सरदार सरोवराचं काम आणि आमच्या कामामुळे त्यांची झोप उडाली आहे का? पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, रुपाला, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल लोकांना आमच्याच नावाने आवाहन करत म्हणत आहेत की, काँग्रेस किंवा आपला मतदान देऊ नका.” “त्यांच्या आपआपसातील भांडणात आम्हाला अडकवण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे नर्मदा प्रकल्पाच्या नावाखाली सरकारने गुजरातच्या जनतेला दिलेली आश्वासनं खोटी ठरली आहेत. त्यामुळे जनता भाजपाला मतं देणार नाही अशी त्यांना भीती आहे. अशा स्थितीत बोट वाकडं करून मतं मिळवण्यासाठी पैसा, सत्ता अशा सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. असं असताना ते नर्मदा प्रकल्पावरच सर्वाधिक वक्तव्ये करत आहेत,” असं मत मेधा पाटकर यांनी म्हटलं. “नर्मदा बचाव आंदोलनाच्या संघर्षामुळेच आज जवळपास ५० हजार कुटुंबांचं पुनर्वसन झालं आहे.“सरदार सरोवरचं पाणी अदानींच्या चार बंदरांना मिळालं” असे अनेक मुद्दे त्यांन नमुद केले.
must read