मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यात ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय एका महिलेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत आव्हाडांनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे.
रविवारी ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून वाट काढून पुढे सरकत असतानाच रिदा रशीद हा त्यांच्या वाटेत आल्या. त्यावेळी आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला लोटल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे गाडीमध्ये बसलेले असतानाच त्यांच्या समोरच हा सारा प्रकार घडल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. यावर आव्हाडांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणताय की “पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासांत २ खोटे गुन्हे दाखल केले. यातील एक गुन्हा हा ३५४ कलमांतर्गत आहे. मी या पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही,”
must read
- IRCTC North East Tour: ईशान्येकडील “या “सुंदर ठिकाणांना अवघ्या 40 हजारात भेट द्या , पहा कोणती आहेत
- Indian Cricket Team: अर्र…’हे’ खेळाडू झाले निराश; जाणून घ्या काय आहे या निराशेचे कारण