मुंबई : रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टात धाव घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला आहे. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“मला अजिबात आनंद झालेला नाही. ३५४ चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर ती भगिनी समोरुन चालत येताना दिसत आहे. तिच्या मनात हे सगळं ठरलेलं असावं. कारण मी तिला बाजूला केलं नसतं तर ती माझ्या अंगावर पडली असती. नंतर माझ्यावर एक मोठा गुन्हा दाखल झाला असता. पण मला देवाने बुद्धी दिली आणि मी तिला बाजूला केलं. मला अडकवण्यासाठी हे सगळं रचलं होतं. पण देवाने मला वाचवलं,” असं आव्हाड म्हणाले आहेत. उद्धाटनाप्रसंगी एखाद्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी हात लावला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मला संपवण्यासाठी ठरवून हे खालच्या पातळीवरील राजकारण झालं असल्याचा गंभीर आरोपही आव्हाडांनी केला आहे. या प्रकणावेळी अनेक नेत्यांनी निगेटिव्ह प्रतिक्रीया दिली होती. तर सुप्रिया सुळेंनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता.
must read