मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रारात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी राज्य सरकारने १ व ५ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, या निर्णयावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणतात“शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणं योग्य नाही. निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात. यापूर्वी असं कधी घडल्याचे मला आठवत नाही. आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशी प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे. “आज ३६५ दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून जवळपास पावणे दोनशे सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे याचा आपण कुठं गांभीर्याने विचार केला पाहिजे, राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे”,
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ”शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर मत्र्यांचे विविध प्रकारचे स्टेटमेंट सुरू आहेत. जी व्यक्तव्य अजितबात करण्याची गरज नाही. अशा प्रकारची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याची प्रयत्न सुरू आहे. मी मध्यंतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून या वाचाळवीरांना आवरा, असे सांगितले होते. आजपर्यंत कधी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका होत नव्हती. मात्र, आता वरिष्ठ पदांवर बसलेल्या व्यक्तींनाही काय बोलावं याचं तारतम्य राहिलेलं नाही. प्रवक्तेपदावर असताना आपण काय बोललं पाहिजे, यांच भान ठेवलं पाहिजे, वरून ते प्रवक्ते म्हणतात, माझी काही चुकी नाही. एखाद्यावेळी चुकल्यानंतर आपण माफी मागतो. मात्र, आज तसे होताना दिसत नाही”, असेही ते म्हणाले.
must read