मुंबई: गुजरात निकालावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आरोप केला होता. “गुजरातचा निकाल अपेक्षितच आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती तर नक्कीच अटीतटीची लढाई झाली असती. पण, बहुधा दिल्ली तुम्ही घ्या आणि गुजरात आम्हाला सोडा, असं साटंलोटं आप आणि भाजपात झालं असावं, अशी लोकांना शंका आहे,” असं संजय राऊत म्हणाले होते.
संजय राऊतांच्या या विधानावर आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हिमाचलचा संपूर्ण निकाल अजून हाती यायचा आहे. गुजरातमध्ये सातव्यांदा बहुमत घेऊन सरकार स्थापन होईल, असं दिसत आहे. हा विक्रम आहे. जेव्हा हा विक्रम होतो. तेव्हा काही लोकांच्या पोटात मुरडा येतोच आणि त्याचा आवाज आपण बघत आहोत,” असा खोचक टोला शेलार यांनी विरोधकांना लावला आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर बोलताना शेलार यांनी म्हटलं, “काही लोक संपादक आहे की पादक हे बघावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी वायुप्रदूषणाचे काम म्हणजे संजय राऊत यांची पत्रकार परिषद,” असे शेलार यांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
must read