मुंबई: भाजपाचे खासदार धनंजय महाडीक यांनी तर कर्नाटकमधील जनतेला तुमचा रस्ता कोल्हापुरातून जातो याची आठवण करत इशारा दिला आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी यावर तोडगा निघाला पाहिजे असं मतही मांडलं आहे. “मी कोल्हापुरात स्थायिक असून माझ्यापासून १० किमी अंतरावर कर्नाटक हद्द सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. पण काल महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या दगडफेकीचा मी जाहीर निषेध करतो. हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. पण असं असताना रस्त्यांवरची अशी दादागिरी, गुंडगिहारी करणं हे त्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नागरिकांना शोभत नाही,” असा संताप धनंजय महाडीक यांनी व्यक्त केला आहे.
“तुम्ही कर्नाटकात आमच्या वाहनांवर हल्ले करत आहात, पण तुम्हालाही देशभरात कुठेही जायचं असेल तर महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवावं. कोल्हापूर, सोलापूर कुठेही जायचं असेल तर त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र शांत बसणार नाही. यावर तोडगा निघाला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.
must read