मुबंई: सततच्या वातावरण बदलामुळे व्हाइरल इंफेक्शन वाढत असून त्याचा फटका नेत्यांवर देखील होतना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आजारी पडले आहे. त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व्हायरल इंफेक्शनमुळे रुग्णालयात ते दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. आज संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या सल्लानुसार ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. तर आता भुजबळ व्हायरल इंफेक्शनमुळे आजारी पडले. त्यांनाही काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
must read
- आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना खुले चॅलेंज; चिन्हाबाबत केलाय महत्त्वाचा दावा
- Pizza Recipe:मुलांना रोटी आवडत नाही, तर पटकन बनवा रोटी पिझ्झा, रेसिपी आहे खूप सोपी