मुंबई : नेत्यांची मुलं राजकारणात नव्याने एंट्री करताना दिसत आहे . असे असतानाच आता काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एक सूचक ट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर ते चांगलच गाजत आहे. एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत त्यांनी आपल्या मुलीच्या राजकीय पदार्पणाविषयी सूचक विधान केलं आहे. अशोक चव्हाणांनी केलेल्या या ट्वीटमुळे त्यांची धाकटी कन्या श्रीजया यांचा राजकारणात पदार्पण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेत सहभागी झाली. यावेळी तिने पदयात्रेत खासदार राहुल गांधी यांच्यासमवेत चर्चाही केली. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट करून श्रीजयाच्या राजकीय पदार्पणाबाबत सूचक संकेत दिले आहेत. चव्हाणांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच असणार” या ट्वीटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाबाबत असल्याचं बोललं जात आहे.
must read
- अर्र.. तिरंगा हातात असतानाच आला हार्ट आता; भारत जोडो यात्रेदरम्यान घडली दुर्दैवी घटना
- ‘त्यांनी’ शेतकर्यांना एकदा तरी मदत केली का? नारायण राणेंचा खोचक सवाल