मुंबई : “ मराठी भाषा आणि मराठी माणूस याच्या नावाने गळे काढायचे, ते गळेखोर आता कुठे लपले आहेत? कारण, मोदी सरकारने केवळ घोषित नाही केलं, तर प्रत्यक्षात आता करून दाखवलं आहे. की अभियांत्रिकी अभ्यासक्रम हा आपल्या मातृभाषेत करण्याची घोषणा केली आणि आता तर आज मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकांचं विमोचन होत आहे. महराष्ट्रातील गावाखेड्यातील जवळपास डिप्लोमामधील ३७ टक्के विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचं ठरवलं आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात त्याला प्रतिसाद मिळतोय, जे ठरवलं जे सांगितलं ते केलं. मग आज मोदी सरकारने मराठीमध्ये अभियांत्रिकी शाखेच्या पुस्तकाचं विमोचन केलय हे सकगळेखोर एकही स्वागताचा शब्द काढत नाहीत.” आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि विशेष करून माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

याशिवाय “ यामधील काही लोक तर असे आहेत, की ज्यांना झोपेतून जरी उठवलं तरी त्या प्रसिद्ध सिनेमामधील जे वाक्य आहे, कधी उठवलं की ‘बाबा लगीन…’ तसं कधीही काही झालं तरी महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, मराठी झुकणार नाही. हे बोलणारे आता का गळा काढत नाहीत. त्यामुळे यांचं मराठी वरचं प्रेम हे बेगडी आहे. ते शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी, काँग्रेसचा तर प्रश्नच नाही.” असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. याचबरोबर “ आदित्य ठाकरेंना तर आमचा थेट सवाल आहे, तुम्ही मराठी शिक्षण आणि मराठी भाषा यावर राजकारण करतात. मुंबईत तुम्ही मराठी शाळा बंद पाडल्या. १ लाख विद्यार्थी मराठी शाळेत जायचे ते आज ३५ हजारांवर आले आहेत. त्यामुळे एका बाजूला मराठी शिक्षणाची गैरसोय करणारे आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला अभियांत्रिकी ज्ञानालाही मराठीत पुस्तकं देणारं मोदी सरकार. भाजपा मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी काम करते आहे, हा याचा स्पष्ट पुरावा आहे.” असं म्हणत त्यांनी यावेळी माजीमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकाही केली.

must read

Share.

Leave A Reply

Exit mobile version