मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर निशाणा साधला. “सुधांशु त्रिवेदी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं, हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये!” असं खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलं आहे.
याचबरोबर, “इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत त्या सगळ्या बटालियनची घोषवाक्य ही देवांच्या नावाने आहेत, पण फक्त मराठा बटालियनचे घोषवाक्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशु त्रिवेदी आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेमकी काय भूमिका आहे, ही महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी. महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी.” अशी मागणीह खासदार अमोल कोल्हे यांनी युट्यूबर अपलोड केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटलं आहे.
must read
- Healthy Lungs Tips: फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दररोज “या “फळांचे सेवन करा
- कुणीही उठावं आणि टपलीत मारावं असा प्रकार महाराष्ट्रात घडतोय पहा..